breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

डेक्कनच्या सेंट्रल मॉल पार्किंगमध्ये आढळली केमिकल पावडर

पुणे – पुण्यातील फॅशन स्ट्रिट परिसरात लागलेल्या आगीच्या लाळेतून पुणेकर सावरलेले नसताना आणखी एक मोठी घटना समोर आली आहे. डेक्कन परिसरातील सेंट्रल मॉल परिसरात गॅस गळतीच्या भितीने एखच खळबळ उडाली होती. दुपारी 12 वाजता गरवारे कॉलेजजवळ असलेल्या सेंट्रल मॉलमध्ये केमिकलचा उग्र वास येत होता. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचा मोठा त्रास होत होता. याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर काही वेळातच अग्निशमन दलाचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान, मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल पावडर आढळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

अग्निशमन दलाच्य जवानांनी पाहणी केली असता मॉलच्या पार्किंगमध्ये केमिकल पावडर आढळून आली आहे. या केमिकल पावडरमुळे गॅस निर्माण झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्किंगमधील ती पावडर बाहेर काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आली आहे. आता मॉलमध्ये ही पावडर कुठून आली याचा तपास केला जात आहे. एनसीएलचे अधिकारी हा तपास करणार आहेत. गॅस गळतीची शक्यता लक्षात घेता मॉल रिकामा करण्यात आला होता. त्यानंतर एरंडवणा अग्निशमन दलाच्य जवानांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत पुढील धोका टाळला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button