breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कायदेपंडीत आयुक्तांच्या मनमानीला चाप, शिवजयंती होणारच…

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापुरूषांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेला परंपरा असताना कायदेपंडीत आयुक्त हार्डीकरांनी शिवजयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम घेता येणार नसल्याचा उपदेश पदाधिका-यांना दिला. जर, अन्य महापुरूषांचे जयंती उत्सव, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतीक कार्यक्रम घेता येत असतील तर शिवजयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम का घेता येत नाहीत, असा ठोशा लावल्यानंतर आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी शिवजयंतीच्या खर्चाला परवानगी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी साजरी होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शिवजयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्याची मागणी पदाधिका-यांनी केली. त्यावर आज आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्यासोबत पदाधिका-यांची चर्चा झाली. आयुक्तांनी कायद्यावर बोट दाखवित हा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेता येणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांवर संताप व्यक्त केला. जर, अन्य महापुरूषांच्या जयंती उत्सवानिमित्त प्रबोधनात्मक तसेच सांस्कृतीक कार्यक्रम घेता येत असतील, तर छत्रपती शिवाजी महाराज हे सुध्दा महापुरूष आहेत.

महाराजांच्या इतिहासाची माहिती तळागाळातील घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे आपले कर्तव्य आहे. त्याच्या खर्चाला पालिकेने मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. महापौर राहूल जाधव आणि पक्षनेते एकनाथ पवार यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर आयुक्त हार्डीकर यांनी शिवजयंती कार्यक्रमावर खर्च करण्याची तयारी दाखविली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button