ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
फोटो काढण्याच्या बहाण्याने घेतलेले गंठण परत न देता वृद्ध महिलेची फसवणूक
पिंपरी चिंचवड | वृद्ध महिलेचा विश्वास संपादन करून दोघांनी मिळून 80 हजारांचे सोन्याचे गंठन घेतले. ते परत न करता महिलेची फसवणूक केली. ही घटना सोमवारी (दि. 23) सकाळी माऊलीनगर, दिघी येथे घडली.विमल महादेव बांगर (वय 65, रा. दिघी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 23) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या सोबत बोलण्याचा बहाणा केला. त्यानंतर फिर्यादी यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किमतीचे चार तोळ्याचे सोन्याचे गंठण फोटो काढण्यासाठी मागून घेतले. फिर्यादीने विश्वासाने गंठण दिले. त्यानंतर आरोपींनी ते गंठण परत न देता घेऊन जाऊन फिर्यादीची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.