breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

नोंदणी सुरू होताच कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन

नवी दिल्ली – १ मेपासून देशभरात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. या टप्प्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना लस मिळणार आहे. या लसीकरणासाठी आज दुपारी चार वाजल्यापासून नोंदणी सुरू झाली. मात्र, नोंदणी सुरू होताच कोविन अॅपचा सर्व्हर डाऊन झाला आहे. ट्विटरद्वारे याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत.

इकनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी चारच्या सुमारास १७ कोटी ८८ लाख भारतीय आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करत होते. आरोग्य सेतू तसेच कोविन अ‍ॅपवरुन नोंदणी केली तरी मूळ नोंदणीसाठी कोविनच्या अ‍ॅपवरच नोंदणी करणाऱ्यांना रिडायरेक्ट केलं जात असल्याने कोट्यावधी युझर्स एका वेळी नोंदणीसाठी आल्याने सर्व्हर क्रॅश झाल्याचे समजते.

याआधीच्या टप्प्यांमध्ये केंद्र सरकारने सुरक्षा कर्मचारी, आरोग्य सेवक यांच्यासोबतच सुरुवातीला ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि त्यानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू केलं होतं. आता १ मेपासून देशात १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे.

१ मेपासून कोविशिल्डची किंमत वाढणार

गेल्या काही दिवसांमधअये केरळ, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांनी १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात १८ वर्षांवरील सर्वांना करोोनाची लस मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आली आहे. बुधवारी सिरम इन्स्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीचे नवे दर जाहीर करण्यात आले असून त्यानुसार १ मेपासून राज्य सरकारांना कोविशिल्ड लसीचा प्रत्येक डोस ४०० रुपयांना तर खासगी रुग्णालयांना हेच डोस ६०० रुपयांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button