breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिराचं होणार स्ट्रक्चरल ऑडिट

कोल्हापूर |महाईन्यूज|प्रतिनिधी|

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ अशी ओळख असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिराचे आणि दख्खनचा राजा असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिराचे लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. पुढच्या आठवड्यात त्याचं काम सुरु होणार असून मुंबईतल्या एका कंपनीकडून नाममात्र मानधनावर हे ऑडिट करण्यात येणार आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट अर्थातच इमारत संरचना पाहणी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुढाकार घेतला असून यातून मंदिराच्या बांधकामाची स्थिती, स्थिरता याबाबतची सद्यस्थिती समजणार आहे. मंदिर संवर्धन करण्यासाठीही या अहवालाचा उपयोग होणार आहे. तर मंदिराची पडझड झालेला भाग आणि त्याची दुरुस्ती करणेही शक्य होणार आहे तसेच मंदिराच शिल्पसौंदर्य जतनही होणार आहे. विशेष म्हणजे अंबाबाईच मंदिर सातव्या शतकातील असल्याचा उल्लेख आढळतो तर ज्योतिबाचा मंदिर हे सतराव्या शतकात बांधले असल्याचा उल्लेख आढळतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button