TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘एनआयए’कडून दाऊद, अन्य चौघांविरुद्ध आरोपपत्र

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या चार साथीदारांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) शनिवारी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दाऊद टोळीने उकळलेल्या खंडणीचा वापर दहशतवादासाठी झाल्याचे समोर आले आहे. तसेच, मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी दाऊदकडील खंडणीच्याच पैशाचा वापर केला गेला, असा आरोप एनआयएने केला आहे.

एनआयएकडून दाऊद इब्राहिमच्या तीन साथीदारांना अटक केली असून दाऊदसह आणखी काही जणांना आरोपी म्हणून शोध सुरू आहे.  श्रीमंत लोकांकडून खंडणी उकळून त्याचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात होता. अटक करण्यात आलेल्या तिघांना हवालामार्फत पैसे मिळत होते. या पैशाचा वापर मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी झाल्याचा आरोप आहे.

  दाऊद टोळी आणि छोटय़ा शकीलच्या नावाने सलीम फ्रुट हा  खंडणी उकळत असे. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाने तक्रार केल्यानंतर सलीमला अटक करण्यात आली आहे. सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी हे दोघेही दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरवल्याप्रकरणी अटकेत आहेत.  एनआयएच्या आरोपपत्रात या दोघांसह दाऊद आणि छोटा शकीलचा समावेश आहे.

खंडणीसाठी सलीम संबंधित व्यवसायिकाला धमकी द्यायचा. तक्रारदाराची महागडी गाडी त्याने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती. आरोपींनी जबरदस्तीने ६५ लाखांची रोख रक्कमही ताब्यात घेतली होती. या प्रकरणात हवालामार्गे पैसे बाहेर पाठवण्यात आल्याचा आरोप एनआयएने आरोपपत्रात केला आहे.

हे आरोपी

सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी हे दोघेही दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याप्रकरणी अटकेत आहेत. एनआयएकडून दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात या दोघांसह दाऊद आणि छोटा शकीलचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button