breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

स्मार्ट सिटीतले पैसे नेमके गेले कुठे?, सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी

शिर्डी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा हे अभ्यास शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस आहे. या शिबिरादरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. यावेळी सुप्रिया सुळेंनी स्मार्ट सिटीते पैसे नेमके गेले कुठे? असा प्रश्न मोदी सरकारला विचारला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजकारणात चांगली पॉलिसी यावी म्हणून मी संसदेत काम करत आहोत टिका करायची तेव्हा नक्की करतो, पण पॉलिसीवर आम्ही जास्त लक्ष देतो असे सांगतानाच 50 हजार कोटी रुपये स्मार्ट सिटीवर खर्च केले, आणि ५० हजार हजार कोटी अमृत सिटीसाठी खर्च केले आहेत. जवळपास एक लाख कोटी रुपये खर्च झाले मग या स्मार्ट सिटी झाल्या का? याची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी केली.

रामाला आम्ही कधीच विसरलो नाही तो आपला अविभाज्य भाग आहे. हा पक्ष जमीनदारांचा नाही हा सर्व कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे व्यासपीठावर येऊन आपल्यावर कोण टिका करत असेल तर ते आम्हाला पटणार नाही अशा शब्दात आपली नाराजी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केली.

प्रलोभन आणि धाक सध्या वाढत आहे. मिडिया व राजकीय लोकांचे चांगले संबंध असतात. त्यांच्यामध्ये डॉयलॉगचे नाते असावे प्रलोभन व धाकाचे नसावे. बंडखोर आमदारांवर ५० खोक्यांचा आरोप झाला त्यावेळी ५० खोके घेतले नाही याबाबत कुठल्याही आमदारांनी खुलासा केला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

यावेळीखासदार सुप्रियाताई सुळे यांनी धाक व प्रलोभने याबाबतची काही उदाहरणे व दाखले दिले. राष्ट्रवादीकडून तयार थिंक टँक दुसर्‍या पक्षात गेलेले आहेत. आमच्या पक्षाच्या टँलेंटवर ते पक्ष वाढवत आहेत. १०५ पैकी ५० आमदार राष्ट्रवादी काँग्रेस व कॉंग्रेसचे आहेत असा थेट हल्लाबोलही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.

आम्ही इंटरटेनर नाही आम्ही पॉलिसीमेकर आहोत. आम्ही संसदेत पॉलिसीवर काम करतो त्यामुळे चॅनेलवाले अजेंडा ठरवतात आणि आपण बोलतो पण यापुढे आपण अजेंडा ठरवुया आणि त्यांनी त्यावर बोलले पाहिजे. आपण प्रतिक्रिया दिली नाही म्हणून अडचण येत नाही असे स्पष्ट मत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मांडले.

लढेंगे और जितेंगे भी..असे सांगतानाच सध्या असंवेदनशील राजकारण सुरू आहे. येत्या काळात आपल्याला याविरोधात लढायचे आहे यासाठी तयार रहा असे आवाहनही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले. आठ वर्षांत काय केले ते तरी सांगा असा थेट सवाल मोदींना करतानाच या बागुलबुवातून बाहेर पडुया आपण केलेले काम जनतेला सांगुया. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवुया… त्यांचे स्वप्न पूर्ण करुया. आपला पक्ष पूर्ण ताकदीने सत्तेत कसा येईल आणि राज्यात आणि देशात एक नंबरचा पक्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करूया असे आवाहनही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button