breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

आगीच्या दुर्घटनेनंतर सीरमने आज तीन देशांना पाठवला ‘कोव्हिशिल्ड’चा साठा

पुणे – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीत गुरुवारी भीषण आगीची घटना घडली. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने आगीमुळे ‘कोव्हिशिल्ड’ लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे या अग्नी दुर्घटनेनंतर सीरम इन्स्टिट्यूटने आज म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा साठा पाठवून दिला.

वाचा :-‘सीरम इन्स्टिट्यूट’ आग घटना : कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सायरस पुनावाला यांच्यात चर्चा

सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीतील भीषण आगीत मृत्यूमुखी पडलेल्या पाच व्यक्तींच्या कुटुंबियांना सीरम इन्स्टिट्यूटकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. मृतांपैकी दोन जण पुण्यातील असून अन्य दोन जण उत्तर प्रदेश व एकजण बिहारमधील आहे. हे सर्वजण कंत्राटी मजूर असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या आगीवर नियंत्रण मिळविल्याबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले. ‘सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित राहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे’, अशी माहिती पूनावाला यांनी ट्विटरवरुन दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button