breaking-newsमुंबई

‘शिवशाही स्लीपर’ची लवकरच भाडेकपात

  • महामंडळाची खासगी बस गाडय़ांशी स्पर्धा

अवाच्या सवा भाडय़ामुळे प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळालेल्या एसटीच्या शिवशाही वातानुकूलित स्लीपर बसचे भाडे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.

खासगी बस गाडय़ांशी स्पर्धा करण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी एसटीने वातानुकूलित स्लीपर बस चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी पहिली बस शिरपूर (धुळे) ते पुणे मार्गावर चालवण्यात आली. त्यानंतर मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते बीड, जळगाव, औरंगाबाद, अक्कलकोट याबरोबरच अन्य मार्गावर वातानुकूलित स्लीपर बस सेवा सुरू करण्यात आली. सध्या अशा ७४ स्लीपर बस धावत आहेत. परंतु अवाच्या सवा भाडे आणि गैरसोयींचे मार्ग यामुळे प्रवाशांनी या बसकडे पाठ फिरवली. स्लीपर बस धावत असलेल्या मार्गावरच खासगी स्लीपर बसचे भाडे ५०० ते ७०० रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे प्रवासी एसटीच्या स्लीपर बसकडे जाण्याऐवजी खासगी बसचाच पर्याय निवडू लागले. परिणामी एसटीच्या वातानुकूलित स्लीपरचे प्रवासी भारमान १० टक्क्यांपर्यंतच जाऊ लागले. ३० आसनी बसने पाच ते दहा प्रवासी प्रवास करत असल्याने आर्थिक फटका बसू लागला. परंतु आता एसटीने भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शंभर ते सव्वाशेच बस येणार

एसटीच्या ताफ्यात २५० वातानुकूलित स्लीपर बस येणार होत्या. प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे आता १०० ते सव्वाशे बस गाडय़ाच दाखल केल्या जातील. उर्वरित बस गाडय़ा स्लीपरऐवजी आसन प्रकारातील ताफ्यात दाखल केल्या जात आहेत. सध्या ७४ वातानुकूलित स्लीपर बस सेवेत आहेत.

एसटीच्या वातानुकूलित स्लीपर बसचे भाडे कमी केले जाणार आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही भाडे कमी करण्याचे आदेश एसटीला दिले आहेत. स्लीपर बसच्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळेल. – रणजीतसिंह देओल, वस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button