breaking-newsTOP Newsदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडव्यापार

विधायक: चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचा व्यावसायासाठी युवकांना ‘आधार’

व्यवसायात सचोटी अन्‌ प्रामाणिकपणा जपा : ट्रस्टचे सचिव विजय जगताप यांचे मार्गदर्शन

पिंपरी: कोणताही मोठा व्यवसाय हा एका दिवसात निर्माण होत नाही. व्यवसायाला मोठे करण्यासाठी अपार मेहनत घेवून त्यात सातत्य ठेवावे लागते. व्यावसायिक वाटचालीमध्ये सगळेच दिवस सारखे नसतात. अपयशाने खचून न जाता सचोटीने आपला व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. या संघर्षातूनच यशस्वी उद्योजक निर्माण होत असतो, असे मार्गदर्शन चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव विजय जगताप यांनी केले.

चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट ही शहरातील नामांकित सेवाभावी संस्था आहे. आरोग्य शिबीर, तरुणांना स्वयंरोजगारासाठी मदत, विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्यासाठी मदत असे विविध उपक्रम संस्थेच्या वतीने राबविण्यात येतात. आता ट्रस्टच्या वतीने सचिन येडे, स्वाती राऊत, दिलीप खंदारे, अखिल चिंचवडे यांना अंडाभुर्जीची गाडी उपलब्ध करून दिली आहे. या गाड्यांचे वाटप पिंपळे गुरव येथे ट्रस्टचे सचिव विजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार अमोल उंद्रे, एन.एसी.सी. समन्वयक तथा वेंकीजचे सरव्यवस्थापक प्रसन्न पेडगावकर, मनीष कुलकर्णी, योगेश चिंचवडे, दिपक भोंडवे, सोमनाथ भोंडवे, अनुराग चिंचवडे, भूषण चिंचवडे, सौरभ गावडे, राहुल चिंचवडे, सिद्धार्थ शेलार, कुणाल भोंडवे, विकी गायकवाड, दिनेश कनेटकर उपस्थित होते.

विजय जगताप म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या वतीने स्वयंरोजगारासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विविध योजनाही आहेत. यातून प्रेरणा घेवून आम्ही युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा. यासाठी हा उपक्रम हाती घेतला. एका परिवाराने व्यवसायाला सुरुवात केली, तर त्यातून प्रेरणा घेवून इतर तरुणही व्यावसायात उतरतील, असा विश्वास वाटतो.

मराठी युवकांनी व्यवसायात उतरले पाहिजे. व्यवसाय वाढविण्यासाठी सातत्याने नवीन कल्पना व्यावसायात आणल्या पाहिजेत. यामुळे व्यवसाय यशस्वी होतो. एक व्यावसायिक आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण कुटुंब सावरू शकतो. कोणताही व्यवसाय एकाच दिवसात मोठा होत नाही. यासाठी सातत्याने कष्ट आणि मेहनत घेतल्यास एक दिवस हे तरुण नक्कीच स्वाभिमानी उद्योजक होवू शकतील.
– विजय जगताप, सचिव, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button