breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत लांडगे-लांडे दिलजमाई ; आम्ही दोघं तर पै-पाव्हणं

– भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे स्पष्टीकरण 

-भाजपने उमेदवारी दिल्यास शिरुर लोकसभेच्या आखाड्यात उतरणार  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वेा शरद पवार यांनी भोसरीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी आमदार विलास लांडे आणि भाजपचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्यातील विळ्या-भोपळ्यांचे वैर संपवून मुंबईतील एका कार्यक्रमात समेट घडवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यावर आमदार महेश लांडगे म्हणाले की, आमच्या लांडे-लांडगे यांच्यात पुर्वीपासूनच नाते संबंध आहेत,  ‘आम्ही तर पै-पाव्हणं’ अशी सुचक प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच भाजपने शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास निवडणुक लढविणार असल्याचे सुतवाच आमदार लांडगे यांनी केले आहे. 

भोसरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे आणि विद्यमान भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांच्या एकेकाळी गुरु-शिष्यांचे नाते होतेच, शिवाय लांडगे हे लांडेचे भाचे जावई होते, परंतू, 2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान लांडे-लांडगे यांच्यात विळ्या-भोपळ्याचे वैर निर्माण झाले. त्यामुळे गुरु-शिष्यांसह नातेसंबंधाला तडा गेला होता. चार वर्षापासून हेच गुरु-शिष्य एकमेकांना पाण्यात पाहू लागले आहेत.

आगामी शिरुर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून माजी आमदार विलास लांडे यांना उतरविण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभेला लांडे आणि विधानसभेला लांडगे असे एकमेकांना दोघांनी मदत करण्याविषयी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवारांनी दोघांमध्ये समेट घडविल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्या लांडे-लांडगे दिलजमाईवर आमदार महेश लांडगेंनी सुचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे पुर्वाश्रमीचे गुरु-शिष्य पडद्यामागून एकत्र येण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, आमदार महेश लांडगे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने शिरुर लोकसभा मतदार संघासाठी मला उमेदवारी दिल्यास मी आखाड्यात उतरण्यास तयार आहे, त्यावेळी माझ्यापुढे कोणीही असु द्या, त्यांच्या विरोधात ताकदीने लढणार आहे. तसेच पक्ष ज्यांना उमेदवारी देईल, त्यांना निवडून आणण्यासाठी मी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button