breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

चंद्रकांत पाटील, फक्त सुप्रिया सुळेंची नव्हे, देशातल्या महिलांची माफी मागा: खासदार प्रियांका चतुर्वेदी

सांगली: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत. महाविकास आघाडीचे नेते चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत आहेत. आता शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. महिलांशी उद्धट वागणाऱ्यांना आपण धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधताना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांची नव्हे तर संपूर्ण देशातल्या महिलांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देखील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. (shiv sena mp priyanka chaturvedi criticizes bjp leader chandrakant patil)

शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगलीमध्ये आज पत्रकार परिषद घेऊन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर सडकून टीका केली आहे. खासदार चतुर्वेदी म्हणाल्या, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने सध्या महागाईशी लढणाऱ्या देशातील सगळ्या महिलांचा अपमान झाला आहे. भाजपकडून नेहमीच महिलवेर खालच्या पातळीवर टीका केली जाते. संसदेत देखील आपल्याला याचा सामना करावा लागतो. पण या विरोधात आपण नेहमीच आवाज उठवला आहे. जो कोणी महिलांच्या बाबतीत अपमानाजनक टीका करेल, त्याला आपण धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळे यांच्या बरोबर देशभरातील महिलांची माफी मागायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच खासदार संजय राऊत जेव्हा बोलतात, तेव्हा महाराष्ट्राबरोबरच दिल्लीच्या भाजपला देखील त्रास होतो. त्यामुळेच भाजपची सत्ता नसलेल्या महाराष्ट्रवर इडीचे विशेष प्रेम आहे. पण इडीच्या कारवाया करून देखील सरकार पडणार नाही. उलट मजबुतीने सरकार चालवले जात आहे, असा विश्वास खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button