ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
नाशिक फाटा उड्डाणपुलावर होणार ‘बीआरटीएस’ थांबा
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथील नाशिक फाटा पुलावर ‘बीआरटीएस’ स्टेशन बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी 44 लाख 5 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.महापालिकेच्या बीआरटी विभागाकडून नाशिक फाटा उड्डाणपुलावर बीआरटी बसथांबा उभारण्यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. या कामासाठी 2 कोटी 46 लाख 69 हजार 578 रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. या निविदा प्रक्रियेमध्ये चार ठेकेदारांनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये मेसर्स एस. बी. काळे यांनी 16.10 टक्के दराने 2 कोटी 44 लाख 5 हजार रुपये दर सादर केला. त्यानुसार त्यांच्यासोबत नाशिकफाटा उड्डाणपलावर बीआरटी बसथांबा बांधण्यासाठी करारनामा करण्यात येणार आहे. या कामासाठी एक वर्षाच्या कालावधीची मुदत असणार आहे.