breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

येत्या ४८ तासांत राज्यात मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

पुणे : गेल्या आठवडाभरापासून देशातील हवामानात मोठा बदल दिसत आहे. पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील गारवा वाढला आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून येत्या ४८ तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर परिसरात पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. गोवा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे.

हेही वाचा – ‘बेबी पेंग्विनला अटक होणार’; नितेश राणेंनी नाव न घेता आदित्य ठाकरेंना डिवचलं 

तामिळनाडू आणि केरळच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत अंदमान-निकोबार बेट, केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. तर पुढील सात दिवसांत दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

याशिवाय लक्षद्वीप, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्तीसगड आणि ओडिशामधील काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम हिमालयात तीन नोव्हेंबरपर्यंत हलका पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. यासोबतच हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button