breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर;  सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार भव्य शामियाना

सिंधुदुर्ग:  पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असून संध्याकाळी 4.15 वाजता सिंधुदुर्गल येथे पोहोचणार आहेत. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी होणार आहे.  त्यानंतर सिंधुदुर्ग येथे ‘नौदल दिन 2023’ कार्यक्रमाला प्रधानमंत्री उपस्थित राहतील. भारतात नौदलाची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली.  छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान स्मरणात ठेवून शिवरायांना अभिवादन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची प्रात्यक्षिके सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील.  दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो.  2023 या वर्षी नौदल दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारातील योगदानाला कायम स्मरणात ठेवण्यासाठी आदरांजली अर्पण करणार आहेत. महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर तारकर्ली येथे नौदलाच्या प्रात्यक्षितांना हजेरी लावणार आहेत.

गेल्या वर्षी नौदलाचा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेतली होती आणि नौदलाच्या नव्या ध्वजाचा भारतीय नौदलाने स्वीकार केला.  त्यावेळी  प्रथम स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतला नौदलात सामील करून घेण्यात आले होते.

नौदल दिनानिमित्त दरवर्षी भारतीय नौदलाकडून परिचालन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते .भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी नौदलाचे किती योगदान आहे?,हे या निमित्ताने लक्षात येते. यासोबतच सामुद्रिक माहितीसंदर्भात जनजागृती होते.  ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’  नागरिकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात.

सदर  कार्यक्रमाचे खास आकर्षण भव्य शामियाना असणार आहे. या कार्यक्रमासाठी  देशाचे पंतप्रधान, केंद्रीय तसेच राज्याचे मंत्रिमंडळ व अधिकारी, नौदलाचे अधिकारी, विदेशी पाहुणे येथे उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान आणि इतर विदेशी पाहुणे येणार असल्याने येथे कडेकोट  बंदोबस्त ठेवण्यात  आला आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button