आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

पिंपरी-चिंचवड ः कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी संपावर; आरोग्य सेवा सलाइनवर

‘एकच नारा, कायम करा’; १५ वर्षांपासून समायोजनाच्या प्रतीक्षेत; पिंपरी-चिंचवड शहरातील 46 कर्मचारी संपात सहभागी

पिंपरी-चिंचवड ः जवळपास दीड दशकापासून आरोग्य सेवा बजावत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासन सेवेत समायोजन करावे, या मागणीसाठी राज्यभर आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचे 25 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन सुरु आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून पिंपरी-चिचंवड महानगर पालिकेच्या आकुर्डी येथील रुग्णालयात एकूण 46 वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा परिणाम आरोग्य सेवेवर झाल्याचे पहावयास मिळाले. बेमुदत आंदोलनानुसार बिनशर्त समायोजन झालेच पाहिजे व जोपर्यत समायोजन होत नाही तोपर्यत समान काम समान वेतन मिळण्याबाबत लेखी स्वरुपात सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन चालु ठेवण्याचे निवेदन मा. अतिरिक्त आयुक्त पि. चि. मनपा यांना देण्यात आले.

कंत्राटी पद्धतीने गेल्या 15ते 20 वर्षांपासून काम करत आहेत. यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, लेखापाल, टी. बी. सुपरवायझर, कार्यक्रम समन्वकय, टी.बी. हेल्थ व्हिजिटर, लॅब टेकिनिशन फार्मसीस्ट, डीपीएस, एसटीएलएस, एसटीएस, पदावर कार्यरत आहे. वाहन चालक या पदावर काम करीत होते. काम बंद आंदोलन सुरू आहे. मागणी विनाअट कोणतेही शर्त न ठेवता कायमस्वरूपी करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनात डॉ सुधिर दहिटनकर, श्री. सुरज कांबळे, श्री. चंद्रशेखर सरवदे, श्रीमती वैशाली चासकर व श्रीमती सुनिता अधिकारी यांच्यासह सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शविली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड येथील महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आरोग्य अधिकारी व कर्मचारी तुटपुंजा मानधनात सेवा बजावतात. सध्याच्या महागाईच्या काळात हाती पडणाऱ्या मानधनात काम करणे शक्य होत नसल्यामुळे शासन सेवेत समायोजन करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी मागील अनेक वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. परंतु, अद्यापही समायोजनचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डाॅक्टर, कर्मचाऱ्यांनी आकुर्डी महापालिका रुग्णालयासमोर संप पुकारला आहे.

‘एकच नारा, कायम करा’…
आकुर्डी येथील महापालिका रुग्णालयात सकाळी १०:३० च्या सुमारास कंत्राटी आरोग्य अधिकारी, कर्मचारी एकत्र जमले होते. या ठिकाणी शासन सेवेत समावून घेण्याची मागणी करीत कर्मचाऱ्यांनी ‘एकच नारा, कायम करा’ अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधले. महापालिकेच्या आरोग्य कर्माचाऱ्यांना क्षय रुग्णांचे वर्षाचे टार्गेट 3100 रुग्णांचे देण्यात आले आहे. त्यापैकी आता पर्यंत 2368 रुग्ण आहेत. पाहिलंदा क्षयरोग होणारे एकूण 2159 पेशंट आहेत दुसऱ्यांदा 123 पेशंटला क्षयरोग झाला आहे व ते उपचार घेत आहेत.

वेगवेगळ्या पदावर काम करत असतांना 15 ते 20 हाजार रुपये इतका तुटपुंज्या पगारावर गेल्या 15 ते 20 वर्षांपासून काम करीत आहे. त्यामुळे क्षयरोगावर काम करणारे पिंपरी-चिंचवड मनपा 8 दवाखान्याअंतर्गत TBचे काम सुरू असते. शहरामध्ये क्षयरोगाचे 2300 रूग्ण आहेत. यामध्ये पुरुष 1,297, महिला 1071 असे रुग्ण पिंपरी-चिंचवड मनपा अंतर्गत उपचार घेत आहेत. काम बंद आंलोदनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होऊन, आरोग्य सेवा सलाईवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती डॉ. सुधीर दहिटनकर यांनी माहिती दिली.

कोवीड काळात देखील स्वतःच्या जीवाची किंवा कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्यावर 100 टक्के उपस्थित राहुन कामकाजाचे योगदान दिलेले आहे. त्यादरम्यान बऱ्याच कर्मचाऱ्यांना कोवीडची लागण देखील झाली होती. तरी न डगमगता सहभाग दर्शविला होता. प्रगतशिल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या महागाईमुळे किमान गरजा देखिल भागवता येणे शक्य नाही. त्यामुळे क्षयरोग विभागात कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रिक्त पदावर बिनाशर्त समायोजन इतर राज्याप्रमाणे शासन स्तरावर किंवा RCH व NUHM यांच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्तरावर करण्याबाबत लेखी स्वरुपात सकारात्मक निर्णय घेत नाही, तोपर्यत नाईलाजास्तव बेमुदत राज्यव्यापी आंदोलन सुरूच राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button