Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनेक करामुळे व्यापारी वर्ग हैराण; सरसकट एकच कर लावण्याची केली मागणी

मुंबई : प्राप्तिकर, वस्तू व सेवा कर (जीएसटी), मूल्यवर्धित कर (व्हॅट), अबकारी शुल्क, सीमा शुल्क, मालमत्ता कर, व्यवसाय कर, मुद्रांक शुल्क इत्यादी सर्व करांच्या ऐवजी सरसकट एकच मालमत्ता कर लावण्याची मागणी विविध व्यापार संघटनांनी एकत्र येत केली.

वाणिज्य मालमत्तांवर प्रति चौरस फूट 700 रुपये दराने एकत्रित वर्षभराचा कर आगाऊ वसूल केला जावा. देशभरात अंदाजे 10,000 कोटी चौरस फूट व्यावसायिक क्षेत्र आहे, त्यामुळे सहज 70 लाख कोटी रुपयांचे करसंकलन होऊ शकेल.

केंद्र सरकारला सध्याच्या अंदाजापेक्षा किती तरी जास्त कर महसूल मिळेल आणि व्यापार्‍यांना होणारा त्रास आणि अन्यायही थांबेल, असे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट), महाराष्ट्राचे महासचिव आणि ऑल इंडिया फेडरेशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्स अँड एडिबल ऑईल ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर व्ही. ठक्कर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा –  पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सज्ज; कोर कमिटीची बैठक संपन्न

सध्याची कर प्रणाली खूप गुंतागुंतीची आहे. त्यामुळे भ्रष्टाचार व त्रास वाढतो आणि कर अधिकार्‍यांना मोठे सत्तापद मिळवून देणारी आहे, असा दावाही याप्रसंगी करण्यात आला. मुंबईतील उद्योजक सुबोध जयप्रकाश यांनी त्यांच्या करविषयक त्रासाला सर्जनशील वाट मोकळी करून देत, टॅक्स फ्री इंडिया हा संपूर्ण लांबीचा हिंदी चित्रपट तयार केला असल्याची घोषणा यानिमित्ताने करण्यात आली.

यूट्युबवर उपलब्ध हा चित्रपट त्रस्त करदात्यांसाठी आशेचा किरण ठरेल, असा विश्वास याप्रसंगी मुंबई ग्रेन मर्चेंट् असोसिएशनचे अध्यक्ष रमणिक छेडा, कीर्तिभाई राणा (अध्यक्ष, नवी मुंबई मर्चेंट्स चेंबर), चंद्रकांत एस. रमानी (नवी मुंबई को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लिमिटेड आणि योगेश ठक्कर (अध्यक्ष, मेवा मसाला मस्जिद बंदर) प्यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button