breaking-newsपिंपरी / चिंचवड
पुलवामा येथील शहिद जवानांना विशालनगरात ज्येष्ठ नागरिकांची मुकरॅलीतून श्रध्दांजली
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुलवामा येथील दहतवादी हल्ल्यात भारतीय जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याच्या निषेधार्त प्रभाग 26 विशालनगर येथील विशाल ज्येष्ठ नागरीक संघाच्या वतीने प्रभागात मुकफेरी काढली.
सारस्वत बँक, हिंदचौक, डीपी रोड, वाकड रोडमार्गे सारस्वत बँक चौकापर्यंत मुकफेरी काढण्यात आली. यात प्रभागातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. सारस्वत बँक चौकात काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
पाकीस्तान विरूद् घोषणा देऊन त्याप्रसंगी प्रभागाच्या नगरसेविका आरती चोंधे, दिलीप बालवडकर, विशाल ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रंगनाथ थोपटे, व्दारकानाथ खरे, आधार पाटिल, तसेच प्रभागातील सर्व नागरीक व मान्यवर उपस्थितीत होते.