पिंपरी / चिंचवड

सूसगावातून मॅफेड्रॉन जप्त : एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

सूसगाव येथे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करुन मॅफेड्रॉन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 19) रात्री केली.

पद्‌मसिंह हेमंत पाटील (वय 22, रा. सुखवानी पॅनोरमा, सूसगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनिरूद्ध महादेव सावर्डे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील याच्याकडे मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा घालून त्यांच्याकडून तीन ग्रॅम वजनाचे मॅफेड्रॉन आणि कार असा एकूण सहा लाख 10 हजार 680 रुपयांचा ऐवज जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button