आरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. शिवाजी ढगे यांना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी पदोन्नती

पिंपरी चिंचवड | कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत उल्लेखनीय काम करणारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे यांना सेवा ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच डॉ. रविंद्र मंडपे, डॉ. नासेर अलवी यांनाही पदोन्नती दिली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी काढले आहेत.

ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदाची रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याकरिता महापालिका पदोन्नती समितीची 31 मे 2021 रोजी बैठक झाली. महापालिका प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने व विभागाची आवश्यकता विचारात घेता ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त ठेवणे योग्य नाही. त्यासाठी पदोन्नती समितीने पदोन्नतीपूर्व वैद्यकीय अधिकारी पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अर्हता, मत्ता व दायित्व आणि शिस्तभंग विषयक कारवाई, सेवाविषयक तपशील पडताळून डॉ. शिवाजी ढगे, डॉ. रविंद्र मंडपे आणि डॉ. नासेर अलवी यांना ज्येष्ठतेनुसार ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली.

वैद्यकीय मुख्य कार्यालयात त्यांची पदस्थापना आहे. वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सविस्तर कामकाज आदेश निर्गत करावेत, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पहिला, दुसऱ्या लाटेत महापालिकेचे नवीन भोसरी रुग्णालय वरदान ठरले. कोरोनाच्या लाटेत डॉ. शिवाजी ढगे हे भोसरी रुग्णालयात कार्यरत होते. त्यांनी कोरोनाच्या रुग्णांवर यशस्वी उपचार केले. कोरोना काळात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्यानिमित्त त्यांच्या महापौरांनी सत्कारही केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button