Uncategorized

बजेट 2023 ः अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे ‘श्रीअन्न’ काय आहे?

नवी दिल्ली ः
गहू-तांदूळ वगळता इतर ज्या धान्यांवरचं नैसर्गिक आवरण भरड करून काढल्यानंतर त्यांचा वापर आहारात करता येतो त्यांना भरडधान्य म्हणतात. पूर्वी उखळ-मुसळ वापरून या प्रकारच्या धान्यांवरील कवच किंवा साळ, साल काढली जात असे. त्यानंतर दगडी जात्यावर दळून त्या भरडीचं पीठ केलं जाई. काळाच्या ओघात उखळ-मुसळाच्या जागी पिठाच्या गिरण्या आल्या. शेती क्षेत्रात आधुनिक संशोधनं आणि वेगवेगळ्या पिकांची सुधारित वाणंही आली. यामुळेच मिलेट्स म्हणजेच भरडधान्य हा प्रकार थोडा मागे पडत गेला. यालाच श्रीअन्न, मिलेट्स म्हटले जाते. २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, संयुक्त राष्ट्रांनी गेल्या वर्षी भारत सरकारच्या पुढाकाराने २०२३ हे “आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष” म्हणून घोषित केले

या प्रस्तावाला इतर ७२ देशांनी पाठिंबा दिला होता. आज युनियन बजेटदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुद्धा मिलेट्सचे महत्त्व अधोरेखित केले. सीतारमण यांनी सांगितले की, मिलेट्स म्हणजेच भरडधान्य हे संपूर्ण पोषक आहार आहे. म्हणूनच याला भारतात श्रीअन्न सुद्धा म्हंटले जाते. पण नेमकं श्रीअन्न म्हणजे काय? मिलेट्समध्ये कोणत्या धान्याचा समावेश होतो व त्याचा शरीराला नेमका काय फायदा होणार हे आपण जाणून घेऊयात..

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button