breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

Union Budget 2023 : केंद्र सरकार गरिबांवर ‘मेहेरबान’

प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रूपये केले

Nirmala Sitharaman : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण आज आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पादरम्यान मोठ्या घोषणा करत शेतकरी, महिला, आदिवासी, गरीब नागरिकांना आपलंस करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटी रूपये करण्यात आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार २ लाख कोटी रूपये खर्च करत आहे. अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. आमचा आर्थिक अजेंडा नागरिकांसाठी संधी सुलभ करणे, वाढ आणि रोजगार निर्मितीला गती देणे आणि व्यापक आर्थिक स्थिरता मजबूत करणे यावर केंद्रीय आहे, असं सीतारामण यांनी म्हटलं आहे.

बजेटमधील गरिबांसाठी महात्वाच्या घोषणा-

  • ४४ कोटी ६० लाख नागरिकांना जीवनविम्याचं कवच
  • मोफत रेशनचा ८० कोटी लोकांना होणार फायदा, यासाठी २ लाख कोटींचा खर्च
  • गरिबांच्या घरासाठी ७९ हजार कोटींचा फंड
  • तीन वर्षात आदिवासी विद्यार्थांना आधार देण्यासाठी ७४० एकलव्य मॉडेल शाळांसाठी ३८ हजार ८०० शिक्षक व
  • सहाय्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणाररोजगार निर्मितीवर सरकार लक्ष्य देणार
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button