breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयटेक -तंत्रताज्या घडामोडी

‘या’ राष्ट्राध्यक्षांनीही Whatsapp सोडलं, प्रायव्हसी पॉलिसीचा परिणाम

व्हॉट्सअपनं नव्या वर्षात आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. व्हाट्सएपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनं (privacy policy) अनेकांना व्हॉट्सअप सोडण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडलं आहे.

टर्कीचे राष्ट्रपती रेचप तैयप एर्दोगन (Turkish President Recep Tayyip Erdogan) यांनीही व्हॉट्सअप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कार्यालयातील माध्यम विभागानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हाट्सअप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही, टर्कीच्या संरक्षण मंत्रालयानंही आता व्हॉट्सअपचा वापर करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, राष्ट्रपती एर्दोगान यांनी 11 जानेवारीला आपले व्हॉट्सअप ग्रुप्स एन्क्रिप्टेड मेसेजिंग ऍप BiP वर ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला आहे. BiP हे टर्कीचं एक एन्क्रिप्टेड मेसेजिंग ऍप आहे. याची मालकी टर्कसेल इलेटेसिम हिजमेटेलरी एएसकडे आहे. आता सर्वांना BiPवर बनलेल्या अकाउंटच्या माध्यमातून राष्ट्रपती कार्यालय आणि रक्षा मंत्रालयाकडून सूचना आणि माहिती दिली जाईल. राष्ट्रपतीच्या व्हॉट्सअप सोडण्याच्या घोषणेनंतर टर्कीमध्ये या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरुद्ध आवाज अजूनच तीव्र झाले आहेत.

टर्कीमध्ये बहुतांश लोक व्हॉट्सअप सोडून BiP ऍप जॉईन करत आहेत. टर्कसेल कंपनीनं रविवारी सांगितलं, की मागच्या 24 तासात जवळपास 10 लाख नवे युजर्स Bip मेसेंजरसोबत जोडले गेले आहेत. हे ऍप 2013 मध्ये लॉन्च झाल्यांनतर 53 मिलियनहोऊन जास्त वेळा डाउनलोड केलं गेलं आहे.

व्हाट्सएपच्या नवी पॉलिसी स्वीकार करण्यासाठी व्हॉट्सअपनं युजर्सना 8 फेब्रुवरीपर्यंतचा वेळ दिला आहे. जर या पॉलिसीला नकार दिला तर युजर्सचे अकाउंट्स डिलीटही होऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button