breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

‘दरवर्षी तीन गॅस सिलिंडर, दुध मोफत देणार’; कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा

बीपीएल कार्डधारकांना दररोज मोफत दूध देणार

Karnataka : भारतीय जनता पक्षाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. कर्नाटकात १० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर १३ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, भाजपने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात भाजपने अनके मोठ्या घोषणा केल्या आहेत.

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात समान नागरी संहिता आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी लागू करण्याची घोषणा केली आहे. तसेच उगादी, दिवाळी आणि गणेश चतुर्थीला दारिद्र्यरेषेथालील कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर देणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. तसेच बीपीएल कार्डधारकांना दररोज मोफत दूध देणार असल्याचं भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे –

  • कर्नाटकात एकसमान आचारसंहिता
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दररोज अर्धा लिटर नंदिनी दूध
  • कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दर महिन्याला ५ किलो तांदूळ आणि ५ किलो बाजरी
  • उगादी, दिवाळी आणि गणेश चतुर्थीला बीपीएल कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर
  • कर्नाटक ओनरशिप कायद्यात सुधारणा
  • प्रत्येक वॉर्डात लॅब
  • म्हैसूरमधील फिल्म सिटीला दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांचे नाव देण्यात येणार
  • अटल आहार केंद्र
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button