breaking-newsराष्ट्रिय

संधिसाधू युतीमुळे जम्मू-काश्‍मीर पेटले – राहुल गांधी

नवी दिल्ली – भाजप आणि पीडीपीच्या संधिसाधू युतीमुळे जम्मू-काश्‍मीर पेटले. त्या राज्यात निष्पाप नागरिक आणि शूर जवान मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडले. अकार्यक्षमता, द्वेषाला नेहमीच अपयशाला सामोरे जावे लागते, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्‍मीरमधील राजकीय घडामोडींबाबत दिली.

Rahul Gandhi

@RahulGandhi

The opportunistic BJP-PDP alliance set fire to J&K, killing many innocent people including our brave soldiers. It cost India strategically & destroyed years of UPA’s hard work. The damage will continue under President’s rule. Incompetence, arrogance & hatred always fails.

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील यूपीए सरकारने जम्मू-काश्‍मीरसंदर्भात घेतलेली कठोर मेहनत वाया गेली. राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी नुकसान कायम राहील, असे ट्‌विट त्यांनी केले. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी लवकरात लवकर विधानसभा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. तूर्त त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याला अनुकूलता दर्शवली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button