breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

Bird flu: रत्नागिरी आणि कोल्हापुरात पक्षी मृतावस्थेत

रत्नागिरी – बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात अचानक मृत पक्षी आढळल्याने खळबळ उडाली आहे. शहरातल्या उद्यमनगरच्या महिला रुग्णालयात दोन कावळे मृतावस्थेत आढळले. आरोग्य विभागाने मृत कावळे ताब्यात घेतले आहेत.

वाचा :-नांदेड, लातूरसह परभणीचे बर्ड फ्लू अहवाल पाॅझिटिव्ह ! गावात प्रवेशबंदी

दरम्यान, दापोलीत काही दिवसांपूर्वी मृत कावळे आढळलेले. त्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे कळल्यानंतर खळबळ उडालेली. काही दिवसांपूर्वी गुहागरमध्येही मृत कावळे आढळले. तर रत्नागिरीत आठवडा बाजारातही मृत पक्षी दिसलेले. त्यातच आज पुन्हा कावळ्यांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर येथे दोन पक्षी मृतावस्थेत
कोल्हापूर शहरातील रंकाळा तलावाच्या पूर्वेकडील बाजूला असणाऱ्या किनाऱ्यावर दोन पक्षी मृतावस्थेत आढळले. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर रंकाळा परिसरात मृतावस्तेत पक्षी आढळल्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा सतर्क झाली झाली आहे. प्राथमिक तपासणी करून या पक्षांना उत्तरीय तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

हे पक्षी परदेशी स्थलांतरित पक्षी असून स्पॉट बिल म्हणून ओळखले जातात असे आरोग्यविभागाकडून सांगण्यात आल.पक्षांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि बर्डफ्लू बाबतची शंकेचे निरसन हे उत्तरीय तपासणीच्या अहवालाला नंतरच कळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button