breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

नांदेड, लातूरसह परभणीचे बर्ड फ्लू अहवाल पाॅझिटिव्ह ! गावात प्रवेशबंदी

नांदेड – माहूर तालुक्यातील पापुलवाडीत ३ कावळे, ५ कोंबड्या व कंधार तालुक्यातील नावद्याची वाडी येथे ५ कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने भोपाळ येथे पाठवले हाेते. त्यांचे बर्ड फ्लू अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी १० किमीपर्यंत गावात प्रवेशबंदीचे आदेश दिले असून दाेन्ही गावातील एक किमी अंतरावरील ५०० काेंबड्या नष्ट करण्यात येणार आहेत.

वाचा :-महाराष्ट्रात 23 जानेवारीपासून शेतकरी आंदोलन

परभणी, लातूर येथे बर्ड फ्लूमुळे शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. नांदेड जिल्हा प्रशासनही सर्तक झाले असून पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर प्रत्येकी दोन अशी एकूण ३३ पथके स्थापन केली आहेत. दाेन्ही गावातील ५०० पक्षी नष्ट करण्यात येतील, असे सहायक पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. नांदेडसह परभणी जिल्ह्यातील कुपटा (ता. सेलू), पेडगाव व लातूर जिल्ह्यातील केंद्रेवाडी (ता. अहमदपूर), सुकनी (ता. उदगीर), ताेंडार (वांजरवाडी, ता. उदगीर) येथील बर्ड फ्लूचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button