breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोठी बातमी : …अखेर ‘स्पर्श’ संस्थेकडील व्यवस्थापन प्रशासनाने काढले!

– ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये मोफत उपचार असताना रुग्णाकडून पैसे घेतले

– भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस यांचा यशस्वी लढा

पिंपरी | प्रतिनिधी

ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये मोफत उपचार असताना रुग्णाकडून पैसे घेतल्या प्रकरणी अखेर ‘स्पर्श’ संस्थेचे व्यवस्थान अखेर महापालिका प्रशासनाने काढून घेतले.

उद्या सोमवाररी दि. 10 मेपासून ऑटो क्लस्टर कोविड सेंटर महानगरपालिका चालवणार आहे, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

‘स्पर्श’ च्या मनमानी विरोधात भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस यांनी प्रथम आवाज उठवला. महापालिका आयुक्त राजेश पाटील व पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तातडीने कारवाई केली, त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांमधून समाधान व्यक्त होत आहे.

ऑटो क्‍लस्टर येथील कोविड सेंटर चालविणाऱ्या स्पर्श संस्थेत बेडसाठी लाख रुपये लाटणाऱ्या तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार कऱणाऱ्या स्पर्श हेल्थकेअर संस्थेला महापालिकेने मोठा दणका दिला. पोलिसा आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी भ्रष्ट्र, अनागोंदी कारभार करणाऱ्या स्पर्श संस्थेवर तात्काळ कठोर कारवाई करा, अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा गर्भीत इशारा शनिवारी देताच आज (रविवारी) स्पर्श कडून सर्व काम काढून घेण्यात आले आणि त्यांचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. महापालिकेने स्पर्श व्यवस्थापन समाधानकारक काम करु शकलेले नाही, कामात हेळसांड केली असा ठपका ठेवला आणि ताबडतोब काम काढून घेतले. दरम्यान, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यावरच स्पर्शला पाठिशी घातल असल्याचा थेट आरोप सुरू झाल्याने त्यांच्या गळ्यापर्यंत आल्याने त्यांनी अखेर स्पर्शचा कार्यक्रम केला. स्पर्श च्या कर्मचाऱ्यांचा रेमडेसिवीर इंजेक्शन काळाबाजारात सहभाग हे गुन्हेगारी कृत्यात सहभाग असल्याचे स्पष्ट दर्शविते, ते मानवतेला काळीमा फासणारे आणि व्यवस्थापनाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट करते, असाही ठपका महापालिकेने ठेवला आहे.

स्पर्श च्या डॉक्टरांनी चार रुग्णांकडून बेडसाठी पैसे घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. याप्रकरणातील अटक केलेल्या चार डॉक्‍टरांकडून तीन लाख 70 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली. स्पर्श या संस्थेने गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार केल्याचे दिसून आल्याने या संस्थेच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल, असा इशारा पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी महापालिका आयुक्‍तांना पाठविलेल्या पत्रात दिला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यासाठी स्पर्श हॉस्पिटलच्या डॉक्‍टरांनी एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर महापालिका सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्पर्शवर कारवाईची मागणी केली होती. आयुक्तांनी आश्‍वासन दिल्यानंतरही अद्यापपर्यंत कारवाई केलेली नव्हती. पैसे स्विकारल्याप्रकरणी डॉ. प्रवीण जाधव, डॉ. शशांक राळे, डॉ. सचिन कसबे या तिघांसह एका महिला डॉक्‍टरला अटक करण्यात आली. या चौघांकडून 3 लाख 70 हजार रुपये जप्त करण्यात आली असून हे चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यानंतर ऑटो क्‍लस्टर येथील एका कर्मचाऱ्याला दोन मध्यस्थांमार्फत दोन रेमडेसीवीर काळ्या बाजारात 80 हजारांना विकताना रंगेहाथ पकडण्यात आले.
राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक योगेश बहल यांच्यासह सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी स्पर्शच्या विविध प्रकारच्या गंभीर तक्रारी केल्या होत्या.

भागीदार नगरसेवकांची पळापळ…

जेष्ठ नगरसेविका सीमा सावळे,आशा शेंडगे, कुंदन गायकवाड, विकास डोळस, एकनाथ पवार, राहुल कलाटे, राजू मिसाळ, सुजाता पालांडे, अजित गव्हाणे या नगरसेवकांनी स्पर्श प्रकरणावर महापालिका सभागृहात जोरदार हल्ला चढविला होता. महापालिका आयुक्त कारवाईच करत नसल्याने त्यांचा हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला गेला. अखेर खुद्द पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सर्व सूत्रे ताब्यात घेऊन दोन वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांमार्फत सखोल तपास सुरू केला आणि स्पर्शची कुंडली काढली. वर्षभरापूर्वी एक पेशंटसुध्दा दाखल नसताना माहापालिकेने साडेतीन कोटी रुपये बिल कसे दिले, ते पैसे कुठे गेले, कोणत्या बँकेत जमा झाले आणि कोणत्या नेत्याने ते काढून घेतले याचीही चौकशी सुरू झाल्याने नेते आणि संबंधीत भागीदार नगरसेवकांची पळापळ सुरू झाली. आपल्यावरचे आरोप फेटाळून लावण्यासाठी त्यांनी आकांडतांडव केला होता.स्पर्श हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल होळकुंडे यांनी सर्व पायाभूत सुविधा, उपकरणे, साहित्य, औषधे, मोहिती, डाटा, पासवर्ड याच्यासह सर्व ताबा महापालिकेचे ऑटोक्लस्टर कोविड सेंटर प्रभागी डॉ. अभयचंद्र दादेवर यांच्याकडे द्यावा, असे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे. ताबा देण्यास कुठलाही अडथळा आणल्यास फौजदारी कारवाई करावी लागेल असा इशारा आयुक्तांनी दिला होता.

उल्हास जगताप यांना मुख्य समन्वयक पदाची जबाबदारी…
स्पर्श चा ताबा घेण्यात आला असून आता महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्याकडे मुख्य समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या बरोबर वैद्यकीय समन्वयक म्हणून डॉ. अभंयचंद्र दादेवार, प्राध्यापक मनजीत संत्रे, सहयोगी प्राध्यापक संतोष थोरात, सहप्राध्यापक डॉ. अतुल देसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. शगुन पिसे, सहयोगी प्राध्यापक डॉ. आनंद कराळे यांची नियुक्ती कऱण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button