breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

Javan Movie : शाहरूख खानचा ‘जवान’ चित्रपट झाला लीक!

Javan Movie : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा ‘जवान’ हा सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. एकीकडे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे रिलीज होताच हा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे.

तमिळरॉकर्स, एमपी४मूवीज, पागलवर्ल्ड, वेगामूवीज आणि फिल्मीजिलसह वेगवेगळ्या साईटवर ‘जवान’ हा सिनेमा ऑनलाईक लीक झाला आहे. या सर्व साइटवर ‘जवान’ हा सिनेमा HD प्रींटमध्ये उपलब्ध आहे. ‘जवान’ हा सिनेमा भारतातील तब्बल ५५०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. तर जगभरात हा सिनेमा १० हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा – तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटींचं अनुदान वितरित होणार!

‘जवान’ लीक झाल्यामुळे शाहरुखसह निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. पण अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहून निर्माते खूश झाले आहेत. अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘जवान’ या सिनेमाने १७ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘जवान’ हा सिनेमा धमाका करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button