पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे
पिंपरी – रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर चेअरमनपदी निवड झाली आहे.
प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे या गेली दहा वर्षापासून रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध, पुणे येथे प्राचार्या म्हणून कार्य करीत आहेत. यापुर्वीही त्यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर नियुक्ती झाली होती. संशोधन क्षेत्रामधील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक रिसर्च पेपर सादर केले आहेत. तसेच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयातून पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या, रयत शिक्षण संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या विकासामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या आणि पुणे विद्यापीठाच्या विविध कमिट्यांवर त्या कार्यरत आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्रिं. डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव प्रिं. डॉ.विजयसिंह सावंत, माजी सचिव प्रिं. प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, प्रिं. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी यांनी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन केले.