breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#BharatBandh:‘भारत बंद’ला महाराष्ट्रातून प्रतिसाद

मुंबई – केंद्र सरकारने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (८डिसेंबर)भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासूनच भारत बंदच्या या शेतकऱ्यांच्या हाकेला लोकांनी सहकार्य केले आहे.

वाचा :-#BharatBandh: ठाण्यात पूर्व द्रूतगती मार्गावर चक्काजाम

बँक संघटनांनी शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला आहे, मात्र बंदमध्ये सहभागी नसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. बँक कर्मचारी कामाच्या वेळी हातावर काळी पट्टी बांधून निषेध नोंदवणार आहेत. तर बँक सुरु होण्याआधी किंवा नंतर आंदोलन करतील. ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना दिल्या. कडक सुरक्षाव्यवस्था ठेवा आणि करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्या, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.

जवळपास सर्व व्यवसायिक वाहतूक, ट्रक संघटना बंदमध्ये सहभागी होणार असून यामुळे दूध, फळं आणि भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

वाचा :-#BharatBandh: स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाण्यात रेल्वे रोखली

दादरमध्ये सर्व दुकाने, बाजार बंद आहेत. शिवसेनेकडून बोर्ड लावत केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलनात सक्रीय सहभाग घेण्य़ासाठी जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

कराडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा शेतीमाल खरेदी-विक्रीसह भाजीपाला धान्य मार्केट बंद ठेऊन कडकडीत बंद, कराड शहरातील व्यापारी दुकानदारांचाही संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन शेतकरी आंदोलनास पाठिंबा

औरंगाबाद शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद, अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद, औरंगाबाद शहरातील गुलमंडी, पैठण गेट, निराला बाजार आणि कॅनॉट प्लेस कडकडीत बंद, शेतकऱ्यांच्या भारत बंदला व्यापारी आणि व्यावसायिकांचा कडक प्रतिसाद

वसई विरार नालासोपाऱ्यात भारत बंदला सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, रिक्षा आणि खाजगी वाहनांची वाहतूक सुरु

वाचा :-भारत बंद : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींवर टीका…म्हणाले!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button