breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे गुरवच्या राजमाता जिजाऊ उद्यानावर कोट्यावधीची उधळपट्टी

  • उद्यानाच्या स्थापनेपासून देखभाली दुरुस्तीवर वारेमाप खर्च

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांची कामे काढण्यात येवू नये, कारण महापालिकेकडे नवीन प्रकल्पांच्या तरतूदीसाठी निधी उपलब्ध नाही. याकरिता विभाग प्रमुख अधिका-यांना लगाम घातलेला आहे. तसेच महापालिकेच्या उत्पन्न वाढ करण्यासाठी स्थायी सभापती आणि आयुक्तांनी संयुक्तरित्या प्रयत्न सुरु केला आहे. मात्र, पिंपळे गुरवच्या राजमाता जिजाऊ उद्यान स्थापनेपासून देखभाल दुरस्तीवर वारेमाप पैशांची उधळपट्टी सुरु केली आहे. उद्यानावर कोट्यावधी रुपयांचा खर्च करुनही आयुक्तांसह स्थायी सभापतींनी चिडीचूप भूमिका घेतली आहे. याबाबत स्थायी समिती सभेत आज (बुधवारी) खर्चास सभापती विलास मडेगिरी यांनी मान्यता दिली.

महापालिकेच्या विद्युत विभागाने पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविण्यात येणार आहे. विद्युत विषयक कामे करण्याकामे मे.एस.टी.इलेक्ट्रीकल्स प्रा. लि. कंपनीला चार कोटी 14 लाख 99 हजार 335 रुपयापेक्षा 3.01 टक्के कमी दर प्राप्त झाले आहे. या ठेकेदाराकडून काम करुन घेण्यास आणि अटी-शर्थीनूसार निविदेचा करारनामा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

दरम्यान, राजमाता जिजाऊ उद्यानात स्थापत्य विभागाने यापुर्वी कोट्यावधीचा खर्च केलेला आहे. मागील दीड वर्षापासून अनेक कामे या उद्यानात करण्यात आलेली आहे. त्यावर महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. तसेच शिवसेना स्थायी समिती सदस्य राहूल कलाटे यांनी अधिका-यांना जाब विचारला आहे. त्याबाबत स्थापत्य व विद्युत अधिका-यांना सविस्तर माहिती देता आलेली नाही. त्यामुळे एकीकडे शहरात जिजामाता उद्यानावर कोट्यावधीचा खर्च करायचा, दुसरीकडे शहरातील अन्य काही उद्यानात  बालकांना नीट खेळणी देखील उपलब्ध नाहीत. तसेच अनेक उद्यानाची दुरवस्था झालेली आहे. त्याकडे पदाधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे.

 

सुमारे दहा कोटी यापुर्वी खर्च?

पिंपळे गुरव येथे 2006 मध्ये राजमाता जिजाऊ उद्यानावर सुमारे  दोन कोटी रुपये खर्च करून हे उद्यान उभारण्यात आले. जॉगिंग ट्रॅक, दाट झाडी, आकर्षक कारंजे व विस्तीर्ण परिसरात डायनोसॉरची प्रतिकृती हे या उद्यानाचे आकर्षण होते. भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीकडे सुरुवातीला उद्यानाच्या देखभालीचे काम होते. हजारो नागरिकांचा वावर असणाऱ्या या उद्यानाचे नंतर पालिकेच्या उद्यान विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले. 2015मध्ये या उद्यानाच्या नुतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला. दुबईतील मिरॅकल उद्यानाच्या धर्तीवर नुतनीकरणांतर्गत सुशोभिकरण करण्याचे निश्‍चित करण्यात आले. त्यानुसार, महापालिकेने या नुतनीकरणासाठी 4 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद केली. 2016 मध्ये प्रत्यक्षात नुतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. एम. एस. साठे यांची कंत्राटदार म्हणून या कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे. वर्षभराची मुदत या कामासाठी होती; मात्र दीड वर्षे उलटूनही काम अर्धवट स्थितीत होते. तसेच टप्पा एक व दोन असा शब्दखेळ करत दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी पाच कोटींच्या वाढीव खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम आता दहा कोटींच्या घरात पोहचले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button