ताज्या घडामोडीपुणे

एसटी कर्मचाऱ्यांना अजितदादांनी पुन्हा सुनावले

पुणे | मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारयांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी हिंसक आंदोलन केले. मोठा राडा झाला. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सुनावले. आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगत होतो, पण ऐकलंच नाही, असं अजितदादा म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बारामती तालुक्यातील सुपे गावात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांना आम्ही सांगत होतो कुणाच्या बोलण्यात येऊ नका. तुम्हाला ते अडचणी आणतील. चांगलं चाललं असताना काही लोक अडचणी निर्माण करतात. काही लोक भावना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं अजितदादा म्हणाले.

‘बाबांनो… तुम्ही सगळे ड्रायव्हर, कंडक्टर आहात. आपले आहात. तुम्ही कारण नसताना कुणाच्यातरी चिथावणीखोर भाषणाला बळी पडू नका. त्यांच्या चुकीच्या सल्ल्याचा बळी पडू नका. ते तुम्हाला अडचणीत आणतील. कोर्टात प्रकरण गेलं. यासंदर्भात समिती नेमली गेली. विलिनीकरण करायचं की नाही? यासंदर्भात अहवालही आला. हे सगळं चित्र आपल्यासमोर स्पष्ट आहे. नीट काम सुरू असताना त्यात खोडा कसा घालता येईल, याचं काम काहीजण करतात. त्यात नवीन समस्या कशा निर्माण करता येतील. लोकांमध्ये गैरसमज कसे निर्माण करता येतील, लोकांच्या भावना कशा भडकवता येतील, अशा प्रकारचा प्रयत्न दुर्दैवाने काही ठिकाणी होतोय. जनतेला याचा अनुभव आला आहे,’ असं अजित पवार म्हणाले.

‘चंद्रावर गेल्यावर अपघात होणारच की’

आधी म्हणायचं रस्ता करा आणि रस्ता झाला की म्हणतात स्पीडब्रेकर टाका. मग खराब रस्ता होता तेच चांगलं नव्हतं का? तेवढ्यात खाली बसलेला एक व्यक्ती म्हणाला की दादा अपघात होतात. त्यावरही अजित पवारांनी उत्तर दिलं. चांद्रवर गेला असेल. त्यामुळे अपघात होत असेल. आम्ही रात्रीचा प्रवास करतो. आम्हाला बरं काही होत नाही, असं अजितदादा पुढे बोलले.

‘आता मी सुप्रिया आणि साहेब तुमची जनगणना करतो’

सुप्याची लोकसंख्या किती? असा प्रश्न अजित पवारांनी लोकांना केला. त्यावर वेगवेगळी उत्तरं आली. आता साहेब, मी आणि सुप्रिया यांना बोलावतो आणि तुमची जनगणना करतो. साहेबांना सांगतो तुम्ही तिकडून मोजत या, सुप्रियाला सांगतो तू तिकडून ये आणि मी वढाणे गावातून मोजत येतो, असं अजितदादांनी म्हणताच एकच हशा पिकला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button