breaking-newsक्रिडा

BCCI मध्ये दादाचा कार्यकाळ वाढणार?

BCCI च्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीला अधिक कार्यकाळ मिळावा यासाठी बीसीसीआयने पहिलं पाऊल टाकलं आहे. रविवारी मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, लोढा समितीच्या पदाधिकाऱ्यांसाठी असलेल्या शिफारसींमध्ये बदल करण्यावर एकमत झाले आहे.

लोढा समितीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना कोणतंही पद भूषवण्यासाठी Cooling-off period ची अट घालून दिली आहे. या अटीनुसार कोणत्याही पदाधिकाऱ्याने राज्य किंवा BCCI मध्ये ३ वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले असतील, त्याला पुढील ३ वर्ष कोणतंही पद भूषवता येणार नाही. बीसीसीआयचं अध्यक्षपद स्विकारण्यासाठी सौरव गांगुली बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होता. त्यामुळे सौरवचं अध्यक्षपद हे औटघटकेचं ठरणार होतं. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या नियमांत बदल करण्यावर एकमत झालेलं आहे. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आलेले सर्व निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या संमतीसाठी पाठवण्यात येतील असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button