breaking-newsमनोरंजन

नात्यातील वयाच्या अंतरामुळे ट्रोल करणाऱ्यांना अर्जुनचं सडेतोड उत्तर

बॉलिवूडमधील जोड्यांना अनेकदा विविध कारणांवरून ट्रोल केलं जातं. बऱ्याचदा या ट्रोलिंगमुळे त्यांच्या नात्यावरही परिणाम होतो. पण, हल्ली अनेक कलाकार सोशल ट्रोलिंगकडे लक्ष देत नाहीत. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर व मलायका अरोरा अनेकदा एकत्र पहायला मिळतात. यांनी नुकतीच त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. ‘यामध्ये लपवण्यासारखे काही नाही.’ असं अर्जुनाने म्हटले आहे.

यापूर्वीही अनेक जोड्यांना त्यांच्या वयात असलेल्या अंतरावरून सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. प्रियांका-निकनंतर सध्या अर्जुन-मलायका ही जोडी यासाठी खूप चर्चेत आहे. त्यांच्यात असलेल्या वयातील अंतरामुळे त्यांना अनेकदा ट्रोल केलं जातं. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत अर्जुन म्हणाला की, “अशा लोकांकडे मी अजिबात लक्ष देत नाही. त्यांच्या मताला माझ्या लेखी काहीही किंमत नाही. माझ्या व मलायकच्या दृष्टीने या गोष्टी खूप क्षुल्लक आहेत. त्यामुळे याविषयी काहीही बोलण्याची माझी इच्छा नाही कारण या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीयेत. मी या गोष्टींचे स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही.”

अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नातं सर्वश्रुत आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण दोघांनी जाहीरपणे कधीच कबुली नव्हती. ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’च्या प्रीमियरच्या वेळी या दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली. लवकरच ते विवाहबंधनात अडकणार आहेत अशा अनेक चर्चा असल्या तरीही त्यांनी या चर्चांना अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सध्या अर्जुन ‘पानिपत’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या भूमिकेसाठी त्याने विशेष मेहनत घेतली आहे. या चित्रपटात संजय दत्तसुद्धा दिसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button