breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्या – अभिनेते प्रशांत दामले

पिंपरी |महाईन्यूज|

अनलॉकनंतर नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. मात्र, नाटकांसाठीचे भाडेदर जास्त असून परवडणारे नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने नाटकांसाठी 75 टक्के सवलत देवू केली आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही नाट्यगृहांच्या भाडे दरात सवलत द्यावी, असे साकडे अभिनेते प्रशांत दामले यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना घातले. त्यावर, योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्त हर्डीकर यांनी दामले यांना दिले.

शहरात महापालिकेचे चार नाट्यगृहे आहेत. त्यांच्या भाडेदराबाबत चर्चा करण्यासाठी दामले यांच्यासह सांस्कृतिक कार्यक्रम, संयोजन व नाट्य व्यवस्थापक शिष्टमंडळाने गुरुवारी आयुक्त शहर्डीकर यांची भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने पाच नोव्हेंबरपासून नाट्यगृहे, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण, नाटकांचा खर्च पूर्ण भागवणे अवघड जात आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे भाडेदर कमी करावे, असे आवाहन दामले यांनी केली आहे.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”नाटककारांच्या काही अडचणी आहेत. आता नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू झाली आहेत. नाट्यगृह, नाटकांचे बुकिंग दर त्यांना परवडणारे नाहीत. त्यात सवलत द्यावी, असे निवेदन त्यांनी दिले आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button