breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: पाकिस्ताननं पुन्हा पसरले हात; हवंय २ अब्ज डॉलर्सचं कर्ज

पाकिस्तान सरकारसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकारनं जागतिक वित्तीय संस्थांकडे कर्ज मागण्याची योजना तयार केली आहे. करोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला मदतीची आवश्यकता आहे, तर देशाची तिजोरी झपाट्याने रिकामी होत असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे.

पाकिस्ताननं जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. त्यांनी मागितलेलं हे कर्ज जी २० देशांकडून मागण्यात आलेल्या कर्जाच्या तुलनेत अधिक आहे. एक्स्प्रेस ट्रिब्युननं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पाकिस्ताननं जी २० देशांकडून १.८ अब्ज डॉलर्सच्या मदतीची मागणी केली आहे. आशियाई विकास बँकेनं पाकिस्तानला करोनाच्या पार्श्वभूमीवर आपात्कालिन कर्ज म्हणून ३०.५ कोटी रूपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे करोनाविरोधात लढण्यासाठी आवश्यक उपकरणं, तसंच गरीब महिलांना आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.

जीडीपीच्या ९० टक्के कर्ज

आशियाई विकास बँक काही अटींद्वारे पाकिस्तानला कर्जाची रक्कम वाढवून देणार आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधून १.३९ अब्ज डॉलर्सचं आपात्कालिन कर्ज आणि जागतिक बँकेकडूनही २० कोटी डॉलर्सची मदत मिळाली होती. दरम्यान, जूनपर्यंत पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा वाढून तो ३७ हजार ५०० अब्ज पाकिस्तानी रुपये किंवा जीडीपीच्या ९० टक्के होणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्ज फेडण्यावरच खर्च

पाकिस्तान यावर्षी २ हजार ८०० अब्ज रुपयांची रक्कम केवळ कर्ज फेडण्यासाठीच करेल, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) या पक्षाचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी पाकिस्तानवरील सार्वजनिक कर्जाचा बोजा २४ हजार ८०० लाख कोटी रूपये होता. त्यात आता झपाट्यानं वाढ होत असल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button