Uncategorized

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यवर्षात कला क्षेत्रातील दिग्गजांचे पुण्यात स्मरण!

’नृत्यवंदना’ कार्यक्रमाच्या माध्यमातून कला क्षेत्रातील मान्यवरांना मानवंदना

पुणे: स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त पुण्यात अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था पुणे यांच्या माध्यमातून ‘नृत्यवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून कला क्षेत्रातील दिग्गजांना मानवंदना दिली जाणार आहे. जवळपास एक हजार शास्त्रीय नृत्य कलाकार आपल्या नृत्य कलेच्या माध्यमातून ही मानवंदना देणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून, या माध्यमातून देशाच्या विकासात गत ७५ वर्षांत आपले अतुलनीय योगदान देणाऱ्यांचे स्मरण केले जात आहे. याअंतर्गत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था पुणे यांच्या माध्यमातून पुण्यातील कोथरुड मध्ये २६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता पंडित फार्म येथे ‘नृत्यवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्यकला क्षेत्रात आपले अतुलनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना मानवंदना देण्यात येणार आहे. पुणे शहारातील जवळपास एक हजार शास्त्रीय नृत्यांगना आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना शमा भाटे, मनिषा साठे, सुचेता चाफेकर यांचे या प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच नृत्यांगना अरुंधती पटवर्धन, रसिका गुमास्ते, लीना केतकर, मंजिरी कारुळकर, प्राजक्ता अत्रे, सुचित्रा दाते या देखील आपल्या कलाविष्कार सादर करणार आहेत.

सदर कार्यक्रमास केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किसन रेड्डी आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कला क्षेत्रात आपले अतुलनीय योगदान देणाऱ्यांचे स्मरण केले जाणार असून, हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. त्यामुळे या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक अजय धोंगडे आणि पुनीत जोशी यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button