breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई

राहुल गांधी यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?

दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. या प्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द केली आहे.

केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं?

राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॉलीत वादग्रस्त वक्तव्य केले होते. नीरव मोदी, ललीत मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात? या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button