ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

अमोल मिटकरी यांनी श्रीलंकेत स्थायिक होऊन रावणाची पूजा करावी

मिटकरी यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याच पुतळ्याचे दहन महाराष्ट्र भर होईल, अमित गोरखे यांचा इशारा

पिंपरी : आमदार अमोल मिटकरी यांनी अकलेचे तारे तोडून रावण दहनावर बंदी घालावी असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा भाजपा पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. अमोल मिटकरी यांनी श्रीलंकेत स्थायिक होऊन रावणाची पूजा करावी, तसेच त्यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याच पुतळ्याचे दहन महाराष्ट्र भर होईल असा इशारा अमित गोरखे यांनी दिला आहे.

अमित गोरखे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, आमदार अमोल मिटकरी यांनी अकलेचे तारे तोडून रावण दहनावर बंदी घाला असे विधान केले आहे. खर तर रामायणातील संपूर्ण वानर सेना ही मागासवर्गीय वंचित, सर्व समाजातील होती. यांचा उत्तम उल्लेख श्रेष्ठ वाल्मिकी ऋषी यांनी केला असताना याच सर्व समाजाच्या यशाला काळीमा फासण्याचा प्रकार अमोल मटकरी यांनी केला आहे. राज्यात रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे मडकरी यांनी सांगितले. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणाला चॅलेंज देण्याचा प्रकारच खरं तर अमोल मिटकरी करत आहेत.

हा प्रकार अत्यंत निंदनीय असून सर्व जनतेच्या आणि खास करून वंचित, मागासवर्गीय जनतेच्या भावना दुखावणारा आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो, व अशा प्रकारची मागणी आपण पुन्हा त्यांनी केली तर संपूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन उभे करून ठिकठिकाणी त्यांचाच पुतळ्याचे दहन करण्यात येईल असा इशारा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी केला आहे.

रावणाचा एवढा पुळका आलेल्या अमोल मिटकरी यांनी त्वरित माफी मागावी. तसेच तमाम हिंदू जनतेच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. त्यावर माफी मागून वादावर पडदा घालावा असे आवाहन अमित गोरखे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button