breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

महिनाभराच्या घसरणीनंतर पुन्हा वाढल्या सोन्याच्या किंमती…

मुंबई: 8 सप्टेंबरपर्यंत सोन्याची किंंमत जवळपास 5500 रुपयांनी घसरली आहे. म्हणजे महिनाभरात सोनं 10 टक्के कमी झालेलं आहे. मात्र सोन्याचा दर महिनाभरात कमी झाला असला तरी हळूहळू किमती आता पुन्हा वाढू लागलेल्या आहेत. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी  99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,867  रुपये प्रति तोळावरून 51,989 रुपये झालेला आहे.

सोन्याची किंमत 122 रुपये प्रति तोळ्याने वाढलेली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात चांदी एक किलोग्राम 69,325 रुपयांवरून 69,665 रुपये झालेली आहे. दरम्यान विक्रेत्यांनी ग्राहकांना डिस्काउंट दिलेला होता हा डिस्काऊंटही कायम ठेवण्यात आलेला आहे. सोन्याच्या भावातील चढ-उतार यामागील कारण असू शकतंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button