breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना ईडीची नोटीस

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर आज निकाल येणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीटी नोटीस बजावण्यात आली आहे. आयएल आणि एफएस या प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. जयंत पाटील यांना आलेल्या ईडी नोटीसमुळे विविध चर्चा रंगली आहे.

हेही वाचा – राज्यातील सत्तासंघर्ष निकालापूर्वी अजित पवारांचं सूचक विधान; म्हणाले,..

आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. या कंपनीने दिवाळखोरी जाहीक केली होती. या कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यावहार झाल्याचा आरोप होता. या आधी या कंपनी प्रकरणी राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अरूणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button