breaking-newsताज्या घडामोडीपुणे

घटस्फोटित, परित्यक्ता आणि अपत्यहीन महिलांसाठी रविवारी हळदी कुंकू समारंभ

पुणे | प्रतिनिधी

सहारा प्रॉडक्शन हाऊस आणि अक्षदा विवाह संस्था यांच्यातर्फे विधवा घटस्फोटित, परित्यक्ता ,अपत्यहीन महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ रविवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजता धायरी येथे होणार आहे.अक्षदा विवाह संस्थेचे संचालक डॉ राजेंद्र भवाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, अक्षदा विवाह पुनर्विवाह संस्था ही डॉ. पी. के. भवाळकर यांनी 1945 साली स्थापन केली. कुमारिकांचे विवाह जमवण्याबरोबरच विधवा, विधुर घटस्फोटितांचे, दिव्यांग वधु वरांचे इतकेच नव्हे तर जेष्ठ नागरिकांचे विवाह जुळवण्याचे काम सामाजिक हेतूने सातत्याने चालु आहे. आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन पण दिले जात आहे. विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि अपत्यहीन महिलांसाठी विशेष हळदी कुंकू समारंभ समाजभान ठेवून आयोजित करण्यात आला आहे, असे डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी सांगितले.

नाव नोंदणीसाठी ८०८७२०३१३१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनजागृतीसाठी संस्थेतर्फे ‘हळदी कुंकवाचा मान सवाष्ण महिलांनाच का ?’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ६३ जणांनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button