breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भारत फोर्जच्या चाकण कंपनीतील १६७ कामगारांना ‘ले ऑफ’

ले ऑफ रद्द करून कामावर न घेतल्यास आंदोलन करणार

भारत फोर्ज एम्प्लॉईज युनियन व भारत फोर्ज कामगार संघाचा इशारा  

पिंपरी | प्रतिनिधी

कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीचे निमित्त देऊन चाकण येथील भारत फोर्ज कंपनीतील 167 कामगारांना ले ऑफ (काम बंद) दिला आहे. हा ले ऑफ बेकायदा असल्याचा आरोप कामगार संघटनानी केला आहे. सदर प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती कामगारांनी दिली. हा ले ऑफ रद्द न केल्यास तीव्र आनोदाल्न करणारा असल्याचा इशारा भारत फोर्ज एम्प्लॉईज युनियन व भारत फोर्ज कामगार संघाने निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच मुंढवा येथील भारत फोर्ज मध्ये वेतनवाढ प्रलंबित असून त्याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.

युनियनने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्राहकांकडून ६० टक्के मागणी कमी झाली आहे. कच्या मालाची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे २०७ कायम कामगारांपैकी १६७ कायम कामगारांना देण्यासाठी काम उपलब्ध नाही. त्यामुळे १६७ कायम कामगारांना 18 ऑगस्ट 2020 पासून ले ऑफ देण्यात आला. कंपनी व्यवस्थापनाने १७ ऑगस्ट रोजी नोटीस देऊन कामगारांना मागणी केली. कामगारांना देण्यासाठी काम नसल्याचे खोटे कारण न्यायालयास दाखवून ले-ऑफ चे समर्थन केले असल्याचा आरोप युनियनने केला.

परंतु ले – ऑफच्या काळात ट्रेनी कंत्राटी कामगारांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यांच्याकडून प्रोडक्शनची कामे नियमित चालू आहेत. यामधून व्यवस्थापनाने कामगारांची फसवणूक केली असल्याचा आरोप कामगार संघटना करत आहे. त्याबाबत संघटनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनास नोटीस दिली आहे. त्यामध्ये कामगारांना देण्यात आलेला ले-ऑफ रद्द करून 167 कामगारांना कामावर रुजू करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. त्याबाबत २९ डिसेंबर रोजी कामगार संघटनेने पत्र दिले असून व्यवस्थापनाने ते मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे.

त्याच प्रमाणे मुंढवा भारत फोर्ज मध्ये तब्बल 17 महिने वेतनवाढीची मागणी प्रलंबित आहे. कंपनीची आर्थिक स्थिती अति उत्तम आहे. तसेच कोरोनाच्या काळातील कंपनीचे कामकाज पूर्वपदावर आलेले असताना कामगारांच्या मागणीकडे व्यवस्थापन नकारात्मकच असल्याचा आरोप कामगार संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. त्यापेक्षा कामगार कपातीचा मुद्दा व्यवस्थापनास महत्त्वाचा वाटतो आहे. कामगार कपात करण्यासाठी युनियनने सक्रिय पाठिंबा व्यवस्थापनास देण्याचा हट्ट व्यवस्थापनाचा आहे. कामगार कपात करणे हे कार्य युनियनच्या कार्यकक्षेत नसताना व्यवस्थापन अवास्तव मागणी युनियन कडे करीत आहे. त्यामुळे संघटनेच्या वतीने मागण्यांसाठी उपोषण सुरु केले आहे. 5 जानेवारी 2021 पासून युनियनचे जनरल सेक्रेटरी उपोषण करणार आहेत. त्याबाबत 30 डिसेंबर रोजी व्यवस्थापनास पत्र दिले असल्याची माहिती संघटनेने निवेदनाद्वारे दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button