TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपाच्या नेतृत्त्वात पिंपरी-चिंचवडचा सार्वांगीण विकास : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

  • पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे लोकार्पण

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होत आहे. महापालिका प्रशासनाने अत्यंत नियोजनबद्ध विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांना त्याचा निश्चितपणाने फायदा होईल, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण रविवारी करण्यात आले.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार व शहराध्यक्ष महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर हिरानानी घुले, स्थायी समिती सभापती ॲड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे, बाबू नायर, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख येथील बाणेर पुलाजवळील नव्याने विकसित झालेले शहीद अशोक कामठे उद्यान, ग-क्षेत्रीय कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत, प्रभाग क्रमांक २४ सर्वे. नं. २२ थेरगावमधील खेळाचे मैदान, मोरवाडी येथील म्हाडा नवीन विरंगुळा केंद्र, केएसबी चौक येथील अण्णासाहेब पाटील स्मारकाचे उद्घाटन, यासह प्रभाग क्रमांक १० मधील शिवशाहुशंभो उद्यान, राजर्षि शाहू उद्यान, राजर्षि शाहू महाराज क्रिडांगण व व्यायामशाळेचे लोकार्पण, संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली म्युझिकल फाउंटनचे उद्घाटन, पूर्णानगर येथील फ-क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानाचे लोकार्पण, सेक्टर क्रमांक ४ मध्ये साईनाथनगर येथील उद्यान व सेक्टर क्रमांक ३ मधील स्केटिंग ग्राउंडसमोरील उद्यानाचे उद्घाटन, भोसरी येथील कुस्ती केंद्र व बोपखेल येथील बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी आजचा दिवस ऐतिहासिक क्षण आहे. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण झाले. मेट्रोचे पहिले तिकीट काढून मोदी यांनी प्रवासही केला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. दि. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन आज पंतप्रधानानी केले. तसेच, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्पाचे लोकार्पण झाले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी भाजपा कटिबद्ध आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button