breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणे

मागण्यांची माहिती पत्रकारांना दिली म्हणून एस टी वाहकावर निलंबनाची कारवाई

शिरूर | प्रतिनिधी

शिरुर एस.टी. आगारातील महाराष्ट्र एस.टी कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी सहाय्यक वाहतुक निरीक्षकाच्या मनमानी कारभाराविरोधात व व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष , मुख्य सुरक्षा , दक्षता अधिकारी व महाव्यवस्थापक यांनी वेळोवेळी दिलेल्या परीपत्रकीय सूचनांची तातडीने अंमलबजावणी करणे बाबतच्या मागण्यांचे निवेदन कामगारांच्या वतीने शिरुरचे आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले होते. 15 दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास कामगारांच्यावतीने साखळी उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. शिरुर आगारातील सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक देण्यात येत नसून, आगारातील महिला कर्मचाऱ्यांना एका सहाय्यक वाहतूक निरीक्षकाकडून अपमानित करून गैरसोयीचे कर्तव्य देवून मानसिक त्रास दिला जात असल्याचे निवेदनात नमूद केले असून, सदर सहाय्यक वाहतूक निरीक्षकाची निप:क्षपातीपणे चौकशी करण्यात यावी व चौकशी काळात त्यास निलंबित ठेवावे. या व इतर सर्व मागण्यांबाबत दखल घेऊन येत्या 15 दिवसांत निर्णय न घेतल्यास साखळी उपोषणाचा इशारा कर्मचार्‍यांकडून 20 नोव्हेंबर रोजी आगार व्यवस्थापक शिरुर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला होता.

अवश्य वाचा: कोरोनावरील लस तयार, पुढील आठवड्यात लसीकरणास प्रारंभ

सदर मागण्यांबाबत व सहाय्यक वाहतूक निरीक्षक मनमानी कारभार करत असल्याबाबत संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत असतानाच, मागणी करणाऱ्यांपैकी एका वाहकावर शिरुर कुर्ला – नेहरूनगर कामगिरीवर उशीरा आल्यामुळे व उशीरा आल्याचे कारण विचारले असता, उलट सुलट उत्तरे दिल्याचा आरोप करत एस टी प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे सदर निलंबन परीपत्रकामध्ये कर्मचाऱ्यांनी मागण्यांच्या निवेदनाची माहीती पत्रकार बांधवांना दिल्यामुळे व पत्रकारांनी फोन करून आगार व्यवस्थापक यांना माहिती विचारुन बातमी प्रसारीत केल्याचे कारणही निलंबन पत्रकात म्हटले आहे. सहाय्यक वाहतूक निरीक्षकाची पाठराखण करण्यासाठी हा संपूर्ण खटाटोप केला जात असल्याच्या चर्चांना तालुक्यात उधाण आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगार व्यवस्थापक हे सहाय्यक वाहतूक निरीक्षकाचा बचाव करण्यासाठी आगारातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणून, माझी कोणतीही तक्रार नाही असे लिहून घेतले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

सहाय्यक वाहतूक निरीक्षकावर कारवाई होणार का?

शिरूर आगारातील वाहतुक निरीक्षक कर्मचाऱ्यांबरोबर मनमानी कारभार करत असताना आवाज उठवल्यामुळे एका वाहकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.आता याच पद्धतीने सहाय्यक वाहतूक निरीक्षकावर आता काय कारवाई होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

” आगार व्यवस्थापक यांच्याशी उद्धट वर्तवणूक केली नसून, यातील आरोपांमध्ये तथ्य नाही, आजारी असल्याने मला कामगीरीवर येण्यास उशीर झाला.सदर कारवाई सुडबुद्धीने करण्यात आली आहे. हा कामगारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.”
– माधव मुंढे, वाहक, शिरूर आगार.

” सदर निलंबन कारवाई ही वरीष्ठ पातळीवरून करण्यात आली असल्याने, याबद्दल मी माहिती देऊ शकत नाही, या बाबत वरीष्ठ अधिकारी माहिती देतील.”
– महेंद्र माघाडे, आगार व्यवस्थापक, शिरूर.

” आगार व्यवस्थापक यांच्याशी उद्धट वर्तवणूक केल्यामुळे निलंबण करण्यात आले आहे. निलंबण पत्रकातील पत्रकारांचा उल्लेख मी बघुन घेतो. कोणालाही पाठीशी घालण्याचा विषय नाही.प्रशासनाच्या विरोधात बोलण्यामुळे कारवाई करण्यात आली, कारण काळ सोकवता कामा नये.” – रमाकांत गायकवाड, विभागीय नियंत्रक.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button