breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराष्ट्रिय

चांद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणानंतर ‘गगनयान’ मोहिमेतील महत्वाची चाचणी यशस्वी

Chandrayaan-३ : भारताचे चांद्रयान-३ (Chandrayaan-३) हे १४ जुलै रोजी अवकाशात झेपावले आहे. चांद्रयान-३ हे नियोजीत पद्धतीने एक एक टप्पा पार करत आहे. चांद्रयान-३ मोहिमेसोबतच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) म्हणजेच इस्रो आणखी एक मोहिम फत्ते करण्याचा प्रयत्न करत आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताच्या गगनयान अंतराळ मोहीमेचा (Gaganyaan Mission) महत्वाचा टप्पा पार पडला आहे. गगनयानच्या इंजिनाच्या महत्त्वाच्या भागाची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे मानवाला अवकाशात पाठवण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.

एकीकडे चांद्रयान-३ मोहीम मार्गी लागली असतांना इस्रोची ‘गगनयान’ मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. या मोहिमेंतर्गत देशाचे अंतराळवीर इस्रो स्वबळावर अवकाशात पाठवणार आहे. ३ भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी इस्रोची तयारी विविध पातळीवर सुरू आहे. इस्रोच्या गगनयान सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टीमची चाचणी यशस्वी झाली आहे. गगनयानचे सर्व्हिस मॉड्युल एक नियंत्रित द्वि-प्रोपेलेंट आधारित प्रणाली आहे. जी ऑर्बिटल मॉड्यूलच्या गरजा पूर्ण करते. यामध्ये ऑर्बिट इंजेक्शन, परिक्रमा, ऑन-ऑर्बिट कंट्रोल, डी-बूस्ट मॅन्युव्हरिंग आणि चढाईच्या टप्प्यात मदत करते. इस्रोने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

हेही वाचा – भारतातील पहिल्या खाजगी हील स्टेशन ‘लवासा’ची १८१४ कोटी रुपयांना विक्री

गगनयान मोहिमे अंतर्गत अंतराळवीर ३ दिवस अंतराळात राहणार आहेत. यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहे. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या चाचण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट, टेस्ट व्हेईकल मिशन्स, पॅड अॅबॉर्ट टेस्ट, मानवरहित उड्डाण या चाचण्या करण्यात येतील. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर भारत गगनयानातून मानवाला अंतराळात पाठवणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button