breaking-newsराष्ट्रिय

छत्तीसगडच्या संपावरील सहाशे नर्सेसना अटक

रायपुर – वेतनवाढीच्या मागणीसाठी संपावर असलेल्या छत्तीसगड राज्यातील सहाशे परिचारीकांना काल अटक करण्यात आली. सरकारने त्यांना कामावर रूजू होण्याचा आदेश दिला होता. तो त्यांनी मानला नाहीं म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यांनी संप सुरूच ठेवल्याने अत्यावश्‍यक सेवा कायद्याचा बडगा उगारून या संपकरी 607 परिचारीकांना अटक करण्यात आली. त्या सर्वांना रायपुर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

वेतन वाढ व पदोन्नती या मागण्यासाठी गेल्या 18 मे पासून या परिचारीका राज्यव्यापी संपावर आहेत. हा संप मोडून काढण्यासाठी सरकारने एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांना या परिचारीकांच्या जागी कामाला ठेवले आहे. ज्यांनी कामावर जाण्याची तयारी दर्शवली असेल त्यांनाच कारागृहातून सोडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. सरकारने निर्दयी कारवाई केली असून त्याचा संपकरी संघटनेने निषेध केला आहे. अटक करण्यात आलेल्या नर्सेस मध्ये काहीं गर्भवती आहेत त्यांनाही सरकारने कारागृहात घातले आहे असा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button