breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामगार सुरक्षेबाबत कारखान्यांना सक्ती करा

  • कष्टकरी महासंघाची मुख्यमंत्री, कामगारमंत्री यांच्याकडे मागणी.

पिंपरी : प्रतिनिधी

देशभरातील औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यबळाचे नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरण रक्षणासाठी म्हणून दरवर्षी ४ मार्च ते ११ मार्च या कालावधीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. पिंपरी-चिंचवड शहरात काही कारखान्यासामोर त्याबाबतचे सुरक्षा फलक दिसले. मात्र याबाबत कष्ट करना-या कामगारांमध्ये जनजागृती केली जात नसल्याचे चित्र आहे. कामगारांची जीवितहानी टाळण्यासाठी सुरक्षा बाबत प्रशिक्षण देण्यात यावे. त्याचे तंतोतंत पालन न करना-या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू तसेच अप्पर कामगार आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, महिला विभागाच्या माधुरी जलमुलवार ,उपाध्यक्ष भास्कर राठोड, विनोद गवई, बालाजी इंगळे, महादेव गायकवाड, निरंजन लोखंडे मागणी केली.महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, महिला विभागाच्या माधुरी जलमुलवार ,उपाध्यक्ष भास्कर राठोड, विनोद गवई, बालाजी इंगळे, महादेव गायकवाड, निरंजन लोखंडे मागणी केली.

पत्रात नमुद केले आहे की, देशात उद्योग क्षेत्रातील कामगार यांचे हितासाठी, सुरक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा परिषदने महत्वाच्या तरतूदी केल्या. आंतरराष्ट्रीय कंपन्या सोडल्या तर छोटे कारखाने तसेच प्रवेशद्वारावर फलक लावणे पलीकडे काहीच काम होत नाही. सुरक्षा सप्ताहाचे महत्त्व काय हे सर्व प्रकारचे कामगार संघटित, असंघटित असुरक्षित कंत्राटी कामगारांनाही या कामगारांना प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांना सुरक्षा साधने पुरवली जात नाही. याबाबत प्रशिक्षणही दिले जात नाही. त्यामुळे पर्यायाने अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागते. ही गंभीर बाब असून त्याला कंपन्या व उद्योजक जबाबदारीने घेत नाहीत. म्हणून राज्य शासनाने याबाबत कडक पावले उचलणे गरजेचे आहे सुरक्षा सप्ताह म्हणजे ? काय हेच अजुनही माहीत नाही. अनेक उद्योग मालकांनी सुरक्षा सप्ताहाचा केवळ ढोंग उभे केले आहे.

सन १९४८ मध्ये कारखाने अधिनियम हा कायदा लागू करण्यात आला. बेजबाबदारपणे होणारे नुकसान अपघात यातून होणारे मानवांची हानी या बाबत राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने ४ मार्च १९६६ पासून सुरक्षा दिन साजरा केला सुरू केला. तेव्हापासून ४ मार्च ते ११ मार्च या काळात सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. मात्र केवळ प्रवेशद्वारावर फलक लावण्यात पलीकडे याचे काही तारतम्य नाही. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून तसेच आस्थापना कडून त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध प्रकारच्या स्पर्धा घेणे निबंध लेखन, कविता स्पर्धा अशा प्रकारच्या उपक्रमातून कामगारांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. मात्र असं अलीकडच्या कालावधीमध्ये होताना दिसत नाही. कामगारांना आपली जोखीम व्यवस्थापनाकडून शिकवण्याची गरज आहे. कुटुंबप्रमुखाचा अपघातात गेल्यावर कुटुंबाची खूप मोठी होते. त्यांच्या कुटुंबाला कुठल्याही प्रकारचे संरक्षण नसल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर येते . मोठमोठ्या कारखान्या बरोबरच खान, रेल्वे ,गोदामे, बंदरे ,रस्ते पूल निर्मिती ,धरणे विभाग छोटी खाजगी आस्थापने यामध्येही याबाबत जनजागृती करण्याबाबत मुख्यमंत्री व कामगार मंत्री या नात्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व कामगार आयुक्त कार्यालयांना तसे आदेश देऊन सदर च्या कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याबाबत योग्य आदेश देण्यात यावे अशा प्रकारची मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button