breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुख्यमंत्री टेंपररी, तुम्ही परमनंट; UPSC विद्यार्थ्यांना राज ठाकरेंचा कानमंत्र

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादान केलेल्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सन्मान केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज ठाकरेंनी या वेळी विद्यार्थ्यांना एक किस्साही सांगितला. तसेच मुख्यमंत्री टेंपररी, तुम्ही परमनंट आहात, असा कानमंत्रही दिला.

राज ठाकरे म्हणाले, एकदा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एक आयएएस अधिकारी मुख्यमंत्र्यांना शिव्या घालत होते. तिथे सर्व जमले, पत्रकार देखील जमले. त्या अधिकाऱ्याला विचारलं तुम्ही मुख्यमंत्र्यांना शिव्या का घालत आहात. त्यावर तो अधिकारी म्हणाला असूदेत मी पर्मनंट आहे, ते टेम्पररी आहे. तुम्ही तुमची ताकद ओळखा. कुठेही गेलात तरी तुमच्या मनात महाराष्ट्राचा आदर असला पाहिजे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना त्यांच्या राज्याबद्दल प्रेम असू शकतं तर तुम्हालाही असलं पाहिजे. पंतप्रधानांना वाटतं ना प्रत्येक गोष्टी गुजरातमध्ये गेल्या पाहिजेत. असं तुम्हाला वाटलं पाहिजे.

हेही वाचा – चांद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणानंतर ‘गगनयान’ मोहिमेतील महत्वाची चाचणी यशस्वी

प्रत्येकाच्या मनात स्वत:च्या राज्याविषयी प्रेम असतं. तुमच्याही मनात राज्याविषयी प्रेम असलं पाहिजे. ठासून भरलेलं असलं पाहिजे. उद्या तुम्ही देशाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यात जाल, राज्याचा-महाराष्ट्राचा विचार तुमच्या मनातून जाता कामा नये. या उपर तुम्ही सुज्ञ आहात. लोकशाही कशाला म्हणतात हे तुम्हाला आज कळलं असेल. ज्याला दहावीला ४२ टक्के पडलेत तो आयएएस अधिकाऱ्यांचा सत्कार करतोय. याला लोकशाही म्हणतात आपल्याकडे. त्यामुळे तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा.., असंही राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button